संस्थेची माहिती

मुलुंड मधील मराठी बंधु -भगिनींनो ,
सविनय नमस्कार.
'मराठमोळा मुलुंड ' संस्थेची मुहूर्तमेढ काही महिन्यापूर्वी आपण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते कालिदास नाट्यगृहात झालेल्या एका जाहीर समारंभात रोवली होती. त्यानंतर आपण सदस्य नोंदणी हाती घेतली आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला . हि मोहीम घरोघरी जाऊन , समक्ष भेटीगाठी घेत चालली होती. अनेकांनी त्यावर सुचविलं की घरोघरी जाणं , भेटणं चांगलच आहे. पण ते खूप वेळ खाणारं आहे . मुलुंडमध्ये शेकडो मुलुंडकर आहेत . त्या सर्वाना एक एक करीत भेटण्यापेक्षा सर्वाना आपण एकत्र येऊन भेटण्याची हाक देऊ आणि सगळे एकत्र आले की तिथे मराठमोळं मुलुंड संस्थेची त्यांच्याफुडं मांडू . सदसयता नोंदणीही मग त्याच कार्यक्रमात होऊ शकेल. यात उभयपक्षी होणारी गैरसोय टळेल , शिव्या समक्ष गाठीभेटीत एकमेकांशी सवांद सांदणेही शकय होईल.

मुलुंडकरानो ही कल्पना चांगली वाटली आणि त्यानुसार संस्थेने दिनांक २६ एप्रिल २०१५ रोजी ६. वाजता आपल्या भेटीचा रीतसर कार्यंक्रम मुलुंड जिमखाना , मुलुंड (पूर्व) येथे आयोजितकेला आहे . आपल्याला त्यांचं हे समक्ष भेटून , आग्रहानं दिलेलं निमंत्रण आहे ही आमची भावना आपण कृपया लक्षात घ्यावी . तसेच आपल्याला भेटण्यासाठी मराठमोळं मुलुंड उत्सुक होतचं

एक प्रश्न स्वाभिकपणे विचारला जातो की मराठीच्या कल्याणासाठी एवढ्या संस्था आहेत तर आणखी एक संस्था कशाला? 'मराठमोळं' मुलुंड संस्थेचे स्थापनेमागील विचार समजून घेतला की या प्रश्नाचं उत्तर आपोआप मिळेल. 'मराठमोळं मुलुंड' ही संस्था मराठी माणसासाठी सर्वांगिणी विधायक कार्य करावं यासाठी स्थापण्यात आली. मुलुंडमध्ये विविध क्षेत्रे गाजवणारी अनेक मान्यवर मराठी माणसे आहेत. ती विखुरली आहेत . कोणी एखाधा संस्थेत काम करतं. तर, कोणी कुठलायचं संस्थेशी संबधित नाही . अशा सर्वाना एका संस्थेत एकत्र आणावं असा मुखय विचार मराठमोळं मुलुंड ' च्या स्थापनेमागे आहे . ही संस्था मराठी जणांच्या हितासाठी असली तरी ती कोणाच्याही विरोधात उभी राहिलेली संस्था नव्हे हे सुरुवातीसच सांगायला हवं . मराठीजणांसाठी कल्याणकारी कार्य याचा अर्थ अन्य सामाजिक तत्वांना विरोध असा अजिबात नाही. उलट, समाजातील सर्वच घटकांशी घटकांशी चांगला सुसंवाद साधून त्या सुसंवादाचा उपयोगही मुलुंडमधील मराठमोळ्या जनतेसाठी व्हावा असे विधायक उद्धिष्ट त्यामागे आहे. विविध मराठी कार्यक्रम नियमितपणे आयोजित करणाऱ्या काही संस्था मुलुंडमध्ये आहेत. तसच काही मराठी नाट्य किंवा साहित्य विषयक कार्य करणाऱ्याही आहेत.

काही मराठी ज्ञातीसंस्था आहेत , तर काही मराठी ग्रंथालये आहेत. पण मराठमोळं मुलुंड चे उद्धिष्ट सर्वसामवेशक आहे . मराठमोळं मुलुंडकर जर एकत्र आले तर पाच बोटं एकत्र आलेल्या घट्ट मुठीसारखं मोठं कार्य त्यांच्या हातून होईल हा विश्वास मराठमोळं मुलुंड' संस्थेच्या स्थानपनेमागे आहे . स्थापनेला आशीर्वाद देण्यासाठी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे खास पुण्याहून मुलुंडला आले आणि घोडदौड चालू द्या , चला पुढे निश्चयाने ' असा संदेश त्यांनी मराठमोळं मुलुंड संस्थेला त्यावेळी दिला . याचं विचाराने प्रेरीत होवून त्या दिवशी मुलुंडमधील अनेक मराठमोळं पत्रकार , साहित्यिक, कलावंत , डॉक्टर्स , वकील ,इंजिनीयर्स, सामाजिक कार्यकर्तेअशा समाजातील सर्वाना आम्ही एकत्रित केले आहे . ह्या सर्वांमध्ये मिसळण्याची , नवे परिचय करून घेण्याची, सुसंवाद साधण्याची संधी ह्या निमित्ताने आपल्या सर्वांचं मिळणार आहे . खुद्द आपल्याशी परिचय करून घेण्याची इच्छाही अनेकांना आहे . अशा ह्या मराहमोळ्या संमेलनात सहभागी होवून आपल्याही भावना, विचार व्यक्त करा . जेणेकरून आपण घट्टपणे एकवटले जावू.
धन्यवाद !

अध्यक्षीय भाषण

विशेषतः एक प्रश्न स्वाभिकपणे विचारला जातो की मराठीच्या कल्याणासाठी एवढ्या संस्था आहेत तर आणखी एक संस्था कशाला? 'मराठमोळं' मुलुंड संस्थेचे स्थापनेमागील विचार समजून घेतला की या प्रश्नाचं उत्तर आपोआप मिळेल. 'मराठमोळं मुलुंड' ही संस्था मराठी माणसासाठी सर्वांगिणी विधायक कार्य करावं यासाठी स्थापण्यात आली. मुलुंडमध्ये विविध क्षेत्रे गाजवणारी अनेक मान्यवर मराठी माणसे आहेत. ती विखुरली आहेत . कोणी एखाधा संस्थेत काम करतं. तर, कोणी कुठलायचं संस्थेशी संबधित नाही . अशा सर्वाना एका संस्थेत एकत्र आणावं असा मुखय विचार मराठमोळं मुलुंड ' च्या स्थापनेमागे आहे . ही संस्था मराठी जणांच्या हितासाठी असली तरी ती कोणाच्याही विरोधात उभी राहिलेली संस्था नव्हे हे सुरुवातीसच सांगायला हवं . मराठीजणांसाठी कल्याणकारी कार्य याचा अर्थ अन्य सामाजिक तत्वांना विरोध असा अजिबात नाही. उलट, समाजातील सर्वच घटकांशी घटकांशी चांगला सुसंवाद साधून त्या सुसंवादाचा उपयोगही मुलुंडमधील मराठमोळ्या जनतेसाठी व्हावा असे विधायक उद्धिष्ट त्यामागे आहे. विविध मराठी कार्यक्रम नियमितपणे आयोजित करणाऱ्या काही संस्था मुलुंडमध्ये आहेत. तसच काही मराठी नाट्य किंवा साहित्य विषयक कार्य करणाऱ्याही आहेत.

काही मराठी ज्ञातीसंस्था आहेत , तर काही मराठी ग्रंथालये आहेत. पण मराठमोळं मुलुंड चे उद्धिष्ट सर्वसामवेशक आहे. मराठमोळं मुलुंडकर जर एकत्र आले तर पाच बोटं एकत्र आलेल्या घट्ट मुठीसारखं मोठं कार्य त्यांच्या हातून होईल हा विश्वास मराठमोळं मुलुंड' संस्थेच्या स्थानपनेमागे आहे . स्थापनेला आशीर्वाद देण्यासाठी महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे खास पुण्याहून मुलुंडला आले आणि घोडदौड चालू द्या , चला पुढे निश्चयाने ' असा संदेश त्यांनी मराठमोळं मुलुंड संस्थेला त्यावेळी दिला . याचं विचाराने प्रेरीत होवून त्या दिवशी मुलुंडमधील अनेक मराठमोळं पत्रकार,साहित्यिक, कलावंत, डॉक्टर्स,वकील,इंजिनीयर्स, सामाजिक कार्यकर्तेअशा समाजातील सर्वाना आम्ही एकत्रित केले आहे.

मुंबई उपनगर जिलहाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रांतर्गत येणाऱ्या मुलुंड परिसर हा शैक्षणिक , कला , सांस्कृतिक , सामाजिक अशा विविध उपक्रमामुळे नेहमीच कौतुकास्पद राहिला आहे . महाराष्ट्र सेवा संघ , केळकर वझे शैक्षणिक संकुल आदी मान्यवर संस्थाप्रमाणे स्व. सेतू माधवराव पगडी , भाऊसाहेब केळकर , सौ. विजया वाद आदी विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तीचेही मुलुंड साहित्य , संस्कृती , शैक्षणिक कार्यात भरीव योगदान राहिले आहे .

मुलुंडमध्ये विविध जाती , धर्माची वस्ती असली तरी मुलुंडच्या चेहरा आजवर मराठीचं राहिला आहे. मात्र गेल्या काही वर्षात मुलुंड बहुभाषिक बनत चालले सौं मुलुंडमधील मराठी संस्कृती लूप्त होण्याच्या मार्गावर तर नाही ना? अशा भीतीने डोकेवर काढले आहे. या पार्श्वभूमीवर मुलुंडचे मराठीपण टिकवण्यासाठी सर्व म्हणजे सामाजिक , सांस्कृतिक , राजिक्य अशा क्षेत्रातील सर्व मंडळांनी एकत्र येऊन 'मराठमोळं मुलुंड ' या संस्थेची स्थापना करून तिची नोंदणी धर्मदाय आयुक्ताकडे रीतसर केली आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते या संस्थेचा मुहूर्तमेढराबवण्यात अली आहे , संस्थेच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षात आदी उपक्रम यशस्वीपणे राबिवण्यात आले आहेत.

यास्तव सांगावयास मला अभिमान वाटतोय की, मागील वर्षी गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्या निमत्ताने आयोजित शोभायात्रा 'मराठमोळं मुलुंड' प्रथमच सहभागी झाला होतं. त्याचवेळेस आम्ही ठरवलं होतं की फुडे वर्षी संस्था व मोट्या संख्येने शोभायात्रा सामील होईल . यंदा हा विलक्षण सोहळा मुलुंडमधील सर्व संस्थांच्या सोबत अनुभवणार असल्याचा आनंद आम्हास होत आहे.

हेमंत मोरे
(अध्यक्ष 'मराठमोळं मुलुंड')

Top