शनिवार दिनांक 19 ऑक्टोबर 2024 रोजी दिवाळी सणाचे औचित्य साधून वाडा येथील कातकरी समाज स्थित कुटुंबे असलेले गाव म्हणजे वरले, देवळे पाडा,सरसओहळ या गावी आदिवासीं कुटुंबीयांना आपल्या संस्थेतर्फे फराळ,ब्लैंकेट , टॉवेल्स आणि चॉकलेट बिस्कीट यांचे वाटप केले . समाजातील दुर्लक्षित घटकाकडे तिकडे जाऊन प्रत्यक्ष स्वतः, स्वहस्ते वाटप केल्यावर जे समाधान व अनुभूती मिळते ती वेगळीच असते. आपल्या मुलुंडचे श्री.किरण जोशी, वाडा येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर या शाळेच्या विश्वस्त पदी आहेत. या शाळेत 99% मुलं ही आदिवासी कुटुंबातील आहेत व अशा दुर्लक्षित घटकाकडे असे आपुलकीने व प्रामाणिकपणे काम करणे म्हणजे फार मोठं योगदान आहे किरण सरांचे, त्यांनीच या गावाचे नाव सुचविले, त्या गावाजवळ राहणारे माजी शिक्षणाधिकारी श्री. कृष्णाजी जाधव तसेच त्यांचे साडू श्री.संतोष जाधव या दोघांनी आमच्या मराठमोळं मुलुंड या संस्थेला या नियोजन कार्यात मदत केली. वरले गाव व तसेच जवळपास असलेले, देवळे पाडा,सरसओहळ या गावातील मंडळी देखील दिवाळी फराळ घेण्याकरिता आले होते, त्याचा आम्हाला खूप आनंद झाला. या कार्यामध्ये संस्थेच्या विनंतीला मान देऊन आम्हाला आपले सभासद,व हीतचिंतक, मित्रमंडळी, यांनी जे आर्थिक सहकार्य केलं त्याबद्दल मराठमोळं मुलुंड ही संस्था आपणा सर्वांची ऋणी आहे.
मुलुंड पूर्व येथे गणेशोत्सवानिमित्त मराठमोळं मुलुंडतर्फे मुलुंडच्या राजासमोर सामुदायिक अथर्वशीर्षाचे 21 वेळा पठण करण्यात आले. यास मुलुंडकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.
"मराठमोळं मुलुंड" या संस्थेच्या दहावा वर्धापन दिन मुलुंड पश्चिम येथील दयानंद वेदिक विद्यालय येथे दिमाखदार सोहळ्यात संपन्न झाला.
संस्थेचे हितचिंतक व खासदार माननीय श्री.अनिल देसाई यांची उपस्थिती होती.
त्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष श्री. हेमंत मोरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन व संस्थेचे सल्लागार आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार व पत्रकार श्री.प्रकाश बाळ जोशी व पत्रकार संघाचे माजी जेष्ठ पत्रकार श्री.कुमार कदम यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.
संस्थेचे तिनही सल्लागार दैनिक प्रहार चे संपादक डॉ.सुकृत खांडेकर,श्री.प्रकाश जोशी,श्री.कुमार कदम,अध्यक्ष श्री.हेमंत मोरे, विश्वस्त व माजी आमदार श्री.शरद खातु यांनी खुमासदार मनोगते व्यक्त केली. तसेच सचिव सौ.प्राची सोमण यांनी संस्थेची माहिती दिली.
कार्यक्रमा दरम्यान संस्थेच्या जुन्या सहकाऱ्यांचे सन्मान करण्यात आले.
संस्थेच्या विश्वस्त सौ.पद्माताई व पदाधिकारी प्रमोद, गिताली, सोनी,सतीश,संजय,मुकुंद,जयंत प्रधान, मयूर, सदा, जयेश, अनुराधा, अशोक, जनार्दन आदींनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले होते. सूत्रसंचालन सौ.नेहा गोगटे यांनी केले.
स्वप्नील पंडित यांच्या "मेघ मल्हार" वाद्यवृंदात बहारदार गाणी झाली.
सदर कार्यक्रमास मुलुंडचे धडाडीचे खासदार श्री. संजय पाटील यांच्या सुकन्या राजोल पाटील, कैलास पाटील काँग्रेसचे प्रवक्ते भरत सोनी, रिलायन्सचे सीनियर व्हाईस प्रेसिडेंट राजन गुप्ते रत्नागिरीहुन भुषण साटम,नाशिकहुन उद्योगपती जयंत सानप, उदयन घाणेकर, स्टीफन मॅटोस, करंजकर, फिरोज,, लोकाधिकार समिती व वडाळा विधानसभेचे पदाधिकारी धुळप, कर्डिले, नवलकर,कांदळकर, म्हाडाचे उपअभियंता काशिनाथ जोजन, मुलुंडचे शाखाप्रमुख व शिवसेना कार्यकर्ते श्री. चंद्रकांत शेलार, दिनेश जाधव,सनतभाई जोशी, प्रमोद धुरी, इतर मुलुंडचे शाखाप्रमुख व पदाधिकरी,दूरदर्शन कलाकार व लेखिका ज्योती निसाळ,मराठा मंडळाचे पदाधिकारी माधुरी तळेकर, ऐश्वर्या ब्रीद,वसंत भोसले,अरुण चव्हाण,भालेराव,विनिता दरेकर
संस्थेचे माजी सहकारी बापूसाहेब खराडे, प्रकाश वाघ,सारिका कांग्राळकर,नंदिनी गावडे,अलका जोशी, मीरा पत्की,ॲड.राशीनकर व मनिषा राशीनकर, भारतीय आयुर्विमा मंडळ मुलुंडचे सिनियर ब्रँच मॅनेजर राकेश गोंदणे आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.
या कार्यक्रमासाठी एलआयसी, न्यु इंडिया ॲश्युरन्स,ओम ज्वेलर्स, पीएसएन चेन सोल्युशन प्रा.लि., स्नेहा डेकोरेटर्स व केटरर्स, एनकेजीएसबी आदींचे सौजन्य लाभले ...
दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे या श्रावण महिन्यात रविवार दिनांक ११ ऑगस्ट २०२४ रोजी मराठमोळं मुलुंड या संस्थेने दयानंद बँक्वेट हॉल, मुलुंड (प) येथे सामुदायिक कुंकुमार्चन सोहळ्याचे आयोजन केले होते.
कुंकुमार्चन हा आपल्या मराठी संस्कृती व परंपरेचा एक भाग आहे. कुंकुमार्चन म्हणजे देवी पार्वती / आपल्या कुलदेवीचे सहस्रनाम गुरुजींच्या मंत्रोच्चारात घेऊन देवीला कुंकू वाहणे.
हा सोहळा खूपच मंगलमय व प्रसन्न वातावरणात पार पडला. १०० च्या वर महिलांचा सहभाग होता. सर्व महिला आपल्या पारंपारिक आभूषणे आणि वेशात आल्या होत्या.
संपूर्ण हाॅलमध्ये मंगलमय वातावरण निर्माण झाले होते.
श्री.आनंद कार्लेकर व सौ.पल्लवी कार्लेकर हे जोडपे 'मेहुण' म्हणून आमंत्रित केले होते.
शोभायात्रा विरंगुळा केंद्र मुलुंड (पूर्व) येथून निघून चिंतामण गार्डन- गव्हाणपाडा मार्गे- शिवसेना शाखा-जी व्ही स्कीम रोड- रुची हॉटेल - मुलुंड स्टेशन- गणेश टॉकीज- हनुमान चौक- लक्ष्मीबाई शाळे मार्गे -संभाजीराजे बास्केटबॉल मैदानात शोभायात्रेची सांगता झाली
रविवार दि. १७ मार्च २०२४ विरंगुळा केंद्र मुलुंड पूर्व येथे मराठमोळ मुलुंड तर्फे जागतिक महिला दिन साजरा केला. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या व पाहुण्या, मृण्मयी रानडे मॅडम, तसेच कवयत्रींमध्ये मधुरा महंत, डॉ. अलका कुलकर्णी, सौ. मानिनी महाजन, सौ. उज्वला कोरडे, सौ दीप्ती बेंद्रे, शुभदा पाटणकर, सौ. रेणुका कुलकर्णी, सौ. युगंधरा वळसंगकर यांनी कविता सादर केल्या
दि. २५ फेबुवारी २०२४ गुरुप्रतिपदा या निमित्त श्री स्वामी समर्थ मठ लोणावळा येथे मराठ मोळ मुलुंड व गजानन तनया भजनी मंडळ ( मुलुंड) यांच्या संयुक्त विदयमानाने भक्ती संगीताचा कार्यक्रम स्वामी चरणी करण्यात आला.
मंगळवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२४, मराठमोळं मुलुंड संस्थेने मुलुंडमधील २७ सहयोगी संस्था व शाळेतील विद्यार्थ्यांसोबत " मराठी भाषा गौरव दिन" साजरा केला. या निमित्ताने प्रभात फेरी आयोजित करण्यात आली होती. प्रभात फेरीत सामील होणाऱ्या मुलुंड पूर्व येथील शाळा होत्या वामनराव मुरांजन हायस्कुल, सौ.लक्ष्मीबाई इंग्लिश मीडियम स्कुल, तरुण उत्कर्ष विद्या मंदिर, आय ई एस हायस्कुल, आर आर एज्युकेशन ट्रस्ट विद्यालय आणि विद्या प्रबोधिनी हायस्कुल. या पदयात्रेत मुलुंड मधील नामवंत मराठी साहित्यिक, मराठी पत्रकार, व्यावसायिक, कलाकार , क्रीडापटू तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी ,सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांकरिता अल्पोपहार तसेच प्रभात फेरीत सामील होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू देण्यात आल्या .
"मराठमोळं मुलुंड" या आपल्या संस्थेचा कालचा "सफाळे वेढी गाव" येथील "दिवाळी फराळ" वाटपाचा उपक्रम,
उपस्थित वनबांधव व त्यांचे कुटुंबीय व आम्हा सर्वांच्याच मनाला समाधान देणारा असा, खूप सुंदर व
नियोजनबद्ध पार पडला. याचे सर्वस्व श्रेय,आपले हितचिंतक व देणगीदारांनी उदार मनाने या उपक्रमाकरिता
निधी व कौटुंबिक उपयुक्त वस्तूं दिल्यामुळे.
या उपक्रमाकरिता आमचे कार्यकारणी सभासद श्री.केशवजी जोशी यांनी बस उपलब्ध करून दिली, तसेच संपूर्ण
उपक्रमाकरिता पाण्याची व्यवस्था आमचे विश्वस्त अँडवोकेट. संजयजी माळी यांनी केली.
या सर्वांचेच व वर उल्लेख केलेल्या सर्व योगदात्यांचे, ज्यांच्यामुळे हा उपक्रम यशस्वीरित्या पार
पडला त्या सर्वांचेच मराठमोळं मुलुंड संस्थेतर्फे खूप खूप आभार व धन्यवाद.
मराठमोळं मुलुंड
मुलुंड पूर्व येथे गणेशोत्सवानिमित्त रविवारी मराठमोळं मुलुंडतर्फे मुलुंडच्या राजासमोर सामुदायिक अथर्वशीर्षाचे 21 वेळा पठण करण्यात आले. यास मुलुंडकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.
मराठमोळं मुलुख संस्थेच्या ठळक उपक्रमांपैकी एक उपक्रम म्हणजे कुंकुमार्चन उपक्रम व त्याची काही क्षणचित्रे...
मराठमोळं मुलुंड संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा २०२३ यशस्वीरित्या पार पडली
मुलुंडमधील आयुर्वेदिक,होमिओपॅथी व ऍलोपथी अशा वैद्यकीय शाखातील ३ प्रथितयश महिला डॉक्टर्स. डॉ. सुचेता सावंत (आयुर्वेदिक), डॉ. वृषाली देशमुख (होमिओपॅथिक) ,डॉ. स्नेहल पाटील( एमडी स्त्रीरोगतज्ञ ) या प्रथमच एकत्र येऊन सर्व वयोगटातील नागरिकांसाठी आपले अनुभव कथन केले. या कार्यक्रमासाठी श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. इतर संस्थांचे विविध ठिकाणी कार्यक्रम असूनही जवळजवळ 100 जणांची उपस्थिती होती. मंचावर लक्ष्मीची प्रतिमा अतिशय सुंदर दिसत होती. पाहुण्या व विश्वस्त सौ.पद्मा प्रधान यांच्या हस्ते दीप प्रज्वलाने कार्यक्रमास सुरुवात झाली. श्रीमती गीताली देशमुख यांनी केलेले पाहुण्यांचे स्वागत व सौ वैशाली पेडामकर यांचे गणेश वंदन तसेच निवेदन उत्तम. विश्वस्त, कार्याध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार व संस्थेचे सल्लागार माननीय श्री. कुमार कदम यांनी पाहुण्यांचा केलेला सत्कार, सचिव सौ. प्राची सोमण यांचे प्रास्ताविक, मंडळाचे माननीय अध्यक्ष श्री. हेमंत मोरे यांचे मनोगत व सल्लागार डाॅ.सुकृत खांडेकर यांचे भाषण खुप उत्तमरित्या झाले.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मान्यवरांची उपस्थिती... महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. डॉं.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे स्वीय सचिव श्री.प्रल्हाद शेटे साहेब, मुलुंड मधील समाजसेवक म्हणून ओळख असलेले काँग्रेसचे नेते व रोहिदास प्रतिष्ठानचे श्री.कैलासजी पाटील, तरुण उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष श्री.भालचंद्र वैद्य श्री.निशिकांतजी पाटील, श्री.रवींद्र आवटे, आचार्य अत्रे मुलुंड समितीचे मुख्य समन्वयक श्री.श्रीकांत फौजदार, महाराष्ट्र सेवा संघ ग्रंथालय विभागाचे प्रमुख श्री. अरुण भंडारे, अपना बाजार मुलुंड सचिव श्री,वसंतराव भोसले मराठा मंडळ मुलुंड उपाध्यक्ष श्री.अरुण चव्हाण, जुन्नर आंबेगाव रहिवासी संघ मुलुंड चे प्रमुख श्री.सुरेश डुंबरे, एडवोकेट. समाजसेवक अनिल सावंत, संस्कार भारती मुलुंड विभागाच्या सौ.गौरी केतकर, वैशाली नगरचे श्री.व सौ. जगदाळे. संस्थेचे सल्लागार श्री.प्रकाश बाळ जोशी व विश्वस्त श्री शरद खातु सर मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्यार्थी, शिक्षक ,पालक व मुलुंड मधील नागरिकांना मार्गदर्शन करताना...
दिनांक २४ डिसेंबर २०२२ रोजी मराठमोळं मुलुंड व महानगरपालिका टी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम आयोजित केली होती. यात सहाय्यक अभियंता घनकचरा व्यवस्थापन विभागातील मुख्य पर्यवेक्षक श्री. मधुकर तांबे आणि त्यांचा स्टाफ उपस्थित होता. कार्यालयाच्या केशव पाडा सभोवतालचा परिसर स्वच्छ करण्यास संस्थेचे पदाधिकारी व स्थानिक रहिवासी व मनपा कामगार यांचा सहभाग होता. स्वच्छतेच्या महत्वाबाबत अध्यक्ष श्री. हेमंत मोरे यांनी मार्गदर्शन केले.
१४ नोव्हेंबर बालदिनाच औचित्य साधून *महाराष्ट्र भटक्या विमुक्त जाती संघसंचालित, संजीवनी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा, इगतपुरी येथील विद्यार्थ्यांना दिवाळी भेट देण्यात आली.
नवीन विचार नवीन संकल्पना घेऊन आपल्या समोर येत आहोत “महाराष्ट्राचा चेहरा” मुंबई उपनगरा मध्ये.(Face of Maharashtra ) सहाय्यक आयुक्त श्री.प्रसाद खैरनार समाज कल्याण विभाग चेंबूर ह्यांच्या मार्गद्शनाखाली पहिल्यांदा मुंबई उपनगरा मध्ये लहान मुले ,मुली, महिला, पुरुष ,ज्येष्ठ नागरिक ह्यांच्या सोबत तृतीय पंथी ह्यांना घेऊन फेस ऑफ महाराष्ट्राचा या कार्यक्रम चे मुख्य आयोजक रसिका नुपूर -नासीक - घुंगरू , व मराठमोळं मुलुंड आणि पाठीराखा प्रतिष्ठान मुलुंड या सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम दी.९ जानेवारी २०२३ रोजी कवी कालीदास नाट्य सभागृहात सादर करीत आहोत.
दिनांक 30 ऑक्टोबर 2022 रोजी मराठमोळं मुलुंड संस्थेची ७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा यशस्वीरित्या पार पडली, तसेच या सभेदरम्यान सभागृहाच्या परवानगीने आमचे सल्लागार डॉक्टर सुकृत खांडेकर यांना शासनाकडून जो पीएचडी केल्याबद्दल डॉक्टरेट पदवी मिळाली, त्याबद्दल त्यांचा संस्थेच्या सातव्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सत्कार केला त्या क्षणाचे काही क्षणचित्रे... या सभेदरम्यान मुलुंड मधील ज्येष्ठ पत्रकार श्री.उदय तानपाठक, मराठा मंडळाचे सर्वेसर्वा अध्यक्ष श्री.रमेश शिर्के काका, तसेच श्री.अरविंद आवटे, श्री.उदय मुळये, श्री मनोहर सोमण, श्री.चंद्रकांत शेलार,श्री.शशिकांत मोकळ असे अनेक मान्यवर उपस्थित होते..
मराठमोळं मुलुंड प्रस्तुत स्वर तरंग निर्मित अष्टक म्हणजेच आठ दिग्गज मराठी संगीतकारां च्या तीन तास रंगणारा निवडक गाण्यांचा कार्यक्रम. शनिवार दिनांक ८ ऑक्टोबर रोजी मुलुंड पश्चिम येथील कवी कालिदास नाट्यगृहात कार्यक्रम उत्तमरित्या पार पडला.
मराठमोळं मुलुंड व मुलुंडचा राजा यांच्या संयुक्त विद्यमाने सामुदायिक श्री गणपती अथर्वशीर्ष पठणाची 21 आवर्तने अतिशय सुंदर झाली. यात मुलुंडच्या महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. तसेच मराठमोळं मुलुंड संस्थेच्यावतीने मुलुंडच्या राजाला "अथर्वशीर्षाचे मानपत्र" देण्यात आले.
मराठमोळं मुलुंड संस्थेच्या ‘बोध’ या व्याख्यान शाखा अंतर्गत महिला दिनानिमित्त “ जिच्या हाती लेखणी
“ यात नामांकित लेखिकांच्या लेखनाचे *अभिवाचन , कथा , कविता तसेच स्वलिखित लेखन साहित्यव्यासंगी
श्रीमती मधुरा महंत, श्रीमती प्रज्ञा गोखले व श्रीमती शुभदा पाटणकर.*
यांनी सादर केले.
कार्यक्रम सर्वोकृष्ट व अप्रतिम झाला. सचिव प्राची सोमण व सहसचिव गीताली
देशमुख यांचे नियोजन उत्कृष्ट होते. सर्व कार्यकारिणी सभासदांच्या सहकार्याने कार्यक्रम उत्तमरित्या
पार पडला.
मराठमोळं मुलुख संस्थेच्या ठळक उपक्रमांपैकी एक उपक्रम म्हणजे कुंकुमार्चन. १४ ऑगस्ट २०२२ रोजी मुलुंड पश्चिम येथील, चंदन बाग मधील "मुलुंड हायस्कूल"च्या सभागृहात ,पौरोहित्य करणाऱ्या गुरुजींच्या मंत्रोच्चारात कुलदैवतेच स्मरण करत पार्वतीदेवी/अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर कुंकवाचा अभिषेक संस्थेच्या महिला सभासदांनी मिळून केलेला उपक्रम व त्याची काही क्षणचित्रे...
मराठमोळं तरंग शाखेचा स्वामी समर्थांच्या प्रकट दिनी ३ एप्रिल २०२२ रोजी स्वामीराज जनकल्याण केंद्र लोणावळा येथे भक्ती संगीताचा कार्यक्रम झाला. ह्या कार्यक्रमासाठी तरंग ग्रुपचे सर्व गायक कलाकार, अध्यक्ष श्री हेमंत मोरे, विश्वस्त श्री शरद खातू सर भक्तिभावाने हजर होते. हा कार्यक्रम इतका सुरेख झाला की सर्व भक्तगण भक्तीरसाने न्हाहून निघाले. स्वामिराज जनकल्याण केंद्राच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आमचे चांगलें स्वागत करून, चांगलीं व्यवस्था केली होती. ह्या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन श्री सतीश दामले आणि श्री. जयंत प्रधान ह्यांनी केले.
मराठमोळं मुलुंड संस्थेच्या बोध शाखेतर्फे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे . अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त वाचन प्रेरणादिन कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने दि. १६.१०.२०२१ रोजी साजरा करण्यात आला. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिका डॉ .सौ.मंजुषाजी कुलकर्णी यांचे व्याख्यान या प्रसंगी आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे माननीय अध्यक्ष श्री. हेमंत मोरे यांनी केले. माननीय सल्लागार श्री. कुमार कदम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. पाहुण्यांची ओळख प्राध्यापिका सौ.नंदिनी गुजर यांनी केली.डाॅ.मंजुषा यांनी आपल्या मधुर वाणीने दैनंदिन जीवनातील वाचनाचे महत्व पटवून देत उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन माननीय कार्याध्यक्ष श्री.महेश चव्हाण यांनी केले. आँनलाईन कार्यक्रमाची काही क्षणचित्रे.
मराठमोळं मुलुंड संस्थेतर्फे व्यावसायिकांसाठी १० ऑक्टोबर २०२१ रोजी संध्याकाळी ७ वाजता विनामूल्य ऑनलाईन वेबिनार आयोजित करण्यात आले होते. अनेक व्यावसायिकांनी ह्या वेबिनारला उपस्थिती दर्शिवली. मुलुंड मधील प्रतिष्ठित उद्योजक आणि वकील श्री अजित करंदीकर यांनी व्यावसायिकांना मार्गदर्शन केले तर अर्चना फोंडेकर यांनी व्यावसायिकांना ग्राहक अनुभव सांगितले
'मराठमोळं मुलुंड' संस्थेच्या अनेक उपक्रमांपैकी सालाबादप्रमाणे या वर्षीही करोनाच्या संकटात
शासनाचे नियम पाळुन 'मराठमोळं मुलुंड' आणि 'मुलुंडचा राजा' यांच्या संयुक्त विद्यमाने, मुलुंडचा
राजा, मुलुंड (पूर्व) येथे सामूहिक श्री गणपती अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन
करण्यात आले होते.
अथर्वशीर्षाचे २१ वेळा आवर्तन झाले. यात संस्थेचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
प्रामुख्याने सचिव सौ.प्राची सोमण, कु.श्रावणी सोमण व अवनी लाड यांनी प्रामुख्याने म्हटले व सर्व
सभासदांनी छान साथ दिली. एकुण प्रतिसाद चांगला लाभला.
'मराठमोळं मुलुंड' संस्थेच्या अनेक उपक्रमांपैकी सालाबादप्रमाणे या वर्षीही करोनाच्या संकटात
शासनाचे नियम पाळुन 'मराठमोळं मुलुंड' आणि 'मुलुंडचा राजा' यांच्या संयुक्त विद्यमाने, मुलुंडचा
राजा, मुलुंड (पूर्व) येथे सामूहिक श्री गणपती अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन
करण्यात आले होते.
अथर्वशीर्षाचे २१ वेळा आवर्तन झाले. यात संस्थेचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
प्रामुख्याने सचिव सौ.प्राची सोमण, कु.श्रावणी सोमण व अवनी लाड यांनी प्रामुख्याने म्हटले व सर्व
सभासदांनी छान साथ दिली. एकुण प्रतिसाद चांगला लाभला.
मराठमोळं मुलुंड या आपल्या संस्थेची सहावी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक ५ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता मंडळाचे माननीय अध्यक्ष श्री. हेमंत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली नलिनी यशवंत दोडे विद्यालय, विद्यालय मार्ग, राजे संभाजी क्रिडांगणासमोर, मुलुंड (पूर्व) येथे आयोजित करण्यात आली होती. शासकीय नियमानुसार ह्या सभेस मंडळाचे सल्लागार, विश्वस्त , पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
मराठमोळं मुलुंड व महाराष्ट्र शासनाचा कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २८ ऑगस्ट २०२१ रोजी मुलुंडमध्ये ' रानभाज्या महोत्सव ' मोठ्या दिमाखात संपन्न झाला. जवळजवळ पाच जिल्ह्यातून आदिवासी बांधव /भगिनी रान भाज्या विकण्याकरिता मुलुंड मध्ये आले होते. संस्थेतर्फे आपण केलेल्या आवाहनाला मुलुंड,ठाणे, घाटकोपर या ठिकांणाहुन नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. त्यामुळे रानभाज्यांची संपूर्ण विक्री होऊन आदिवासींना थोड्याफार प्रमाणात आर्थिक हातभार लावण्यास मराठमोळं मुलुंड संस्था यशस्वी झाली असे वाटते.
आचार्य अत्रे जयंती कार्यक्रम समिती,मुलुंड व मराठा मंडळ, मुलुंड यांच्या संयुक्त विद्यमाने आचार्य
प्रल्हाद केशव अत्रे यांची १२३वी जयंती करोनाच्या छायेतही शासनाच्या नियमानुसार मोठ्या दिमाखात पार
पडली.
प्रोफेसर श्रीमती अलका कुलकर्णी यांचे सूत्र संचालन, सी.ए.श्री.चंद्रशेखर वझे यांचा समिती
आढावा, मराठा मंडळाचे अध्यक्ष रमेशजी शिर्के यांचे मनोगत, समिती अध्यक्ष श्री.अजितजी करंदीकर यांचे
खुमासदार भाषण यांनी कार्यक्रमास रंगत आली.
त्यानंतर प्रमुख वक्ते ज्येष्ठ पत्रकार श्री. श्रीराम शिधये यांनी अत्र्यांच्या झंझावाती
कारकीर्दीचा , मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील कामगिरीचा आणि अनेक विनोदी किस्स्यांचा
उल्लेख करुन अत्र्यांचे अग्रलेख, विविध प्रसिध्द
अत्रे वाद तसेच नामांकित व्यक्तीमत्वांवर लिहिलेले मृत्युलेख यावर अभ्यासपूर्ण भाष्य केले.
सदर कार्यक्रम मुलुंडमधील २२ नामांकित संस्थांनी एकत्र येऊन केला. यात 'मराठमोळं मुलुंड' ही
आपली संस्थाही सहभागी होती. आपल्या मंडळाचे कार्याध्यक्ष श्री.महेश चव्हाण हे या अत्रे समितीचेही
कार्याध्यक्ष होते. तसेच श्रीमती प्राची
सोमण, श्रीमती ज्योती देशपांडे व श्रीमती गीताली देशमुख याही कार्यकारिणी सभासद होत्या. आपल्या
संस्थेचे खजिनदार श्री. प्रमोद देसाई हे ही उपस्थित होते.
मुलुंड मधीलच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मराठी भाषेत शिक्षण घेऊन, स्वतःच्या कर्तुत्वावर समाजात ज्यांनी नाव कमविले अशा मुलुंड मधील दिग्गज मान्यवरां कडून आजच्या दिवशी आपल्या मराठीजनांनी इंग्रजीच अपरूप बाजूला ठेवून आपल्या पाल्यांना मातृ भाषेत शिक्षण देऊन समाजात किंबहुना जगात मानाचं स्थान व आत्मविश्वास कसा ग्रहण करता येतो व मराठी शिक्षण वर्गाला लागलेली अहोटी का? व कशी? थांबविता येईल हे त्यांच्याच शब्दात त्यांच्याकडून मुलुंडमधील मराठीजनांनी ऐकावं म्हणून टेक्नॉलॉजीमध्ये उच्च शिखरावर असलेल्या यूट्यूबच्या माध्यमातून आज आपल्या मराठमोळं मुलुंड संस्थेने मुलुंड मध्येच नव्हे तर संपूर्ण देशात आजच्या वक्त्यांनी दिलेला संदेश व त्यांचा अनुभव शिकले मराठीतून... घडले समाजातून... या सदरात शेअर केला
बोध शाखेच्या सौ. गीताली देशमुख व सौ. प्राची सोमण या दोघींच अभिनंदन. कार्यक्रम खूप सुंदर झाला याकरिता विष्णु धुरीसरांच सूत्रसंचालन छान झालं तसेच सौ. वैशाली पेडामकर यांच प्रमुख पाहुण्यांचा संदेश वाचन खूप छान झालं, तसेच सौ. प्राची मॅडमनी प्रमुख पाहुण्यांची ओळख खूप छान करून दिली, आणि प्रोफेसर सचिन पिंपळे सर यांचे मार्गदर्शन खूप छान झालं तसेच माननीय महोदय मंत्री श्री सुभाष देसाई सर यांनी खूप चांगला संदेश दिला आणि वेळात वेळ काढून आज आपल्या कार्यक्रमासाठी संदेश व क्लिप पाठवली त्याबद्दल त्यांचे मनापासून संस्थेच्या वतीने आभार व धन्यवाद, त्याचबरोबर आजच्या आपल्या तीनही बालकलाकार ओवी, श्रावणी व अथर्व या तिघांनीही खूप छान प्रेझेंटेशन दिलं, या तिघांचे खूप खूप कौतुक व धन्यवाद, तसेच सौ. गीताली देशमुख यांचे आभार प्रदर्शन छान झालं, सर्वात शेवटी टेक्निकल बाजू संभाळणारा हर्षद याचे मराठमोळं मुलुंड संस्थेतर्फे खूप खूप धन्यवाद.
यावेळी मराठमोळं मुलुंडचे अध्यक्ष श्री.हेमंतजी मोरे,सचिव श्री.राजनजी भोसले,मराठा मंडळाचे निमंत्रक सल्लागार श्री.माने साहेब, सांस्कृतिक समिती प्रमुख सौ.रश्मी राणे, महिला आघाडीतर्फे सौ.उमा लाड आर्वजुन उपस्थित होते.