मराठमोळं मुलुंड

"मराठमोळं मुलुंड" संस्थेची मुहूर्तमेढ काही महिन्यापूर्वी आपण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते कालिदास नाट्यगृहात झालेल्या एका जाहीर समारंभात रोवली होती. त्यानंतर आपण सदस्य नोंदणी हाती घेतली आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला . हि मोहीम घरोघरी जाऊन , समक्ष भेटीगाठी घेत चालली होती. अनेकांनी त्यावर सुचविलं की घरोघरी जाणं , भेटणं चांगलच आहे. पण ते खूप वेळ खाणारं आहे . मुलुंडमध्ये शेकडो मुलुंडकर आहेत . त्या सर्वाना एक एक करीत भेटण्यापेक्षा सर्वाना आपण एकत्र येऊन भेटण्याची हाक देऊ आणि सगळे एकत्र आले की तिथे मराठमोळं मुलुंड संस्थेची त्यांच्याफुडं मांडू . सदस्यता नोंदणीही मग त्याच कार्यक्रमात होऊ शकेल. यात उभयपक्षी होणारी गैरसोय टळेल , शिवाय समक्ष गाठीभेटीत एकमेकांशी सवांद साधणेही शक्य होईल.



मराठमोळं मुलुंड प्रस्तुत स्वर तरंग निर्मित अष्टक म्हणजेच आठ दिग्गज मराठी संगीतकारां च्या तीन तास रंगणारा निवडक गाण्यांचा कार्यक्रम.
शनिवार दिनांक ८ ऑक्टोबर रोजी मुलुंड पश्चिम येथील कवी कालिदास नाट्यगृहात सायंकाळी ४ ते ७ दरम्यान
कार्यक्रमाची तिकिटे मुलुंड पूर्व येथील मराठा मंडळामध्ये उपलब्ध असतील, दिनांक 4 ऑक्टोबर पासून कालिदास येथील तिकीट विंडोवर देखील तिकिटे उपलब्ध असतील. तसेच खाली दिलेल्या आमच्या कार्यकारणी सभासदांना संपर्क केल्यास त्यांच्याकडूनही आपणास तिकीट मिळू शकेल.
श्री. प्रमोद देसाई.- ९८३३५८८५३२
श्रीमती गीताली देशमुख - ९८६९२२४८६६
श्रीमती सोनी ठाकूर - ९८७००७०९०१

कार्यक्रमाचे प्रायोजक
       

मुलुंड उद्योजक सूची

उल्लेखनीय उपक्रम

भारतीय सैनिकांसाठी 'सरहद' कार्यक्रम

२ ऑक्टोबर २०२३ रोजी भुज मधील बी.एस.एफ. बॉर्डर येथील भारतीय सैनिकांसाठी 'सरहद' कार्यक्रम सादर.

पुढे वाचा

कुंकूमार्चन समारंभ २०२३

मराठमोळं मुलुख संस्थेच्या ठळक उपक्रमांपैकी एक उपक्रम म्हणजे कुंकुमार्चन उपक्रम व त्याची काही क्षणचित्रे

पुढे वाचा

नववा वर्धापन दिन कार्यक्रम २०२३

मराठमोळं मुलुंड संस्थेच्या नवव्या वर्धापन दिनाचे काही क्षणचित्रे

पुढे वाचा

‘बोध’ व्याख्यान शाखा कार्यक्रम २०२२

मराठमोळं मुलुंड संस्थेच्या ‘बोध’ या व्याख्यान शाखा अंतर्गत महिला दिनानिमित्त “ जिच्या हाती लेखणी “

पुढे वाचा

नवीन कार्यक्रम

Top