" दहावा वर्धापन दिन सोहळा २०२४
"मराठमोळं मुलुंड" संस्थेचा दहावा वर्धापन दिन येत्या २५ ऑगस्ट रोजी संपन्न होत आहे.
या कार्यक्रमात आपले हितचिंतक व खासदार श्री.अनिलजी देसाई तसेच मुलुंडचे धडाडीचे खासदार श्री.संजय दीना पाटील यांची प्रमुख उपस्थिती आहे.
या वर्धापन दिन सोहळ्यात श्री.स्वप्नील पंडित यांचा "मेघमल्हार" हा मराठी हिंदी गाण्यांचा वाद्यवृंद आहे.
या कार्यक्रमाला आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. तसेच सदर कार्यक्रम सर्वांसाठी खुला असल्याने कृपया आपण आपल्या मित्रपरिवारासह जरूर उपस्थित रहावे ही विनंती.
आसन क्रमांक नसल्याने प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल. त्यामुळे वेळेत येऊन कार्यक्रमाचा आनंद घ्यावा.
स्थळ - दयानंद बँक्वेट हॉल,
दयानंद वेदिक विद्यालय,
देवी दयाल मार्ग
महानगरपालिका कार्यालय, टी विभागासमोर,
मुलुंड पश्चिम- मुंबई ४०० ०८०.
वेळ - रविवार, दिनांक २५ ऑगस्ट २०२४
संध्याकाळी ४ ते ८.
प्राची सोमण
सचिव
मराठमोळं मुलुंड.